सामाजिक उपक्रमातून महाराष्ट्र दिनाचे महत्व
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हयामध्ये बुधवारी (दि.1) ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. अलिबागमधील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात मुख्य शासकिय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीस संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्र दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.
रायगड जिल्हा पोलीस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलीस दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, वाहतूक पोलीस दल, पोलीस ब्रास बॅण्ड पथक, होमगार्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तसेच, जिल्हा सामान्य रुग्णालय 108 रुग्णवाहिका आदींनी संचलनात सहभाग घेतला. या संचालनाचे नेतृत्व कवायत कमांडर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, शिघ्र कृती दलाचे उपनिरीक्षक, शिवराज खराडे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मुख्य कार्यक्रमाच्या अगोदर अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, डॉ. ज्योस्त्ना पडियार, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, तहसिलदार उमाकांत कडनोर, संजय गांधी विभागाचे यादव, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील आदींसह वेगवेगळ्या विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद कार्यालयासमोर पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, समाजकल्याण अधिकारी डॉ. शाम कदम आदी विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी, कर्मचारी, परिचारीका उपस्थित होते. जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा, ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामविकास अधिकार्यांकडून ध्वजारोहण
नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर महाराष्ट्र्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी अरुण कारले यांनी ध्वज फडकावला. यावेळी सरपंच उषा पारधी, सदस्या शिवाली पोतदार, कर्मचारी, पोलीस पाटील व शाळेतील शिक्षिका आदी उपस्थित होते.
कळंबोली येथे ध्वजारोहण
महाराष्ट्र दिनानिमित्त कोकणविभागाचे मुख्य ध्वजारोहण कोकण विभागीय महसूल आयुक्त पी. वेलरासू यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात संपन्न झाले. या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, विभागीय अतिरिक्त आयुक्त विकास पासरे, उपायुक्त विवेक गायकवाड, अमोल यादव, गिरीष भालेराव, लिलाधर दुफारे, प्रमोद केंभावी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरण कर्मचार्यांचा गौरव
महावितरणच्या कल्याण परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर, जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणार्या 53 उत्कृष्ट तांत्रिक कर्मचार्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
यावेळी महाव्यवस्थापक अनिल बर्हाटे, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, निलकमल चौधरी, महेश अचिंनमाने, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता कौमुदी परदेशी, नरेंद्र धवड, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, शशिकांत पोफळीकर, पुरस्कारप्राप्त कर्मचार्यांसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुरुड-जंजिरा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात
महाराष्ट्र दिनानिमित्त मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, मुरुड तहसिलदार कार्यालयातील प्रांगणात तहसिलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासकांडुन मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, सतेज निमकर, पोलिस निरीक्षक निशा जाधव, चिदानंद व्हटकर, मंडळ अधिकारी खुशाल राठोड, मनोज पुलेकर, विजय म्हापुसकर, पांडुरंग आरेकर, मसाल सर, प्रकाश आरेकर, श्रीशैल बहिरगुंडे, नयन कर्णिक, कपिल वेहले पल्लवी डोंगरीकर, विश्वास चव्हाण, स्मिता मुरुडकर, अशोक सबनिस, रूपेश भाटकर, प्रशांत दिवेकर, प्रमोद भायदे, नयन कर्णिक, सतिष जंजिरकर, अभिजित कारभारी, तलाठी रूपेश रेवसकर, राशिद फहीम, आदिंसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाईल मेडिकल युनिट सुरु
महाराष्ट्र दिनानिमित्त पीएम-जनमन अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईल मेडिकल युनिटची सुरुवात करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी मुरुड पंचायत समिती राजेंद्रकुमार खताळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुभाष वाणी, वै.अ. मोबाईल मेडिकल युनिट सतिश्चंद्र कीर, राजेंद्र चुनेकर, नंदकुमार घाडगे, प्राची चौलकर, मोबाईल मेडिकल युनिटचे सर्व सदस्य व पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना ध्वजारोहणाचा बहुमान
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेने एक ऐतिहासिक ठराव केलेला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्तचे ध्वजारोहण वार्षिक परीक्षा निकालात संपुर्ण संस्थेच्या विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावणार्या विद्यार्थांना देण्यात येतो. तर, या ठरावान्वये रा.ग.पोटफोडे विद्यालय खांब येथे मधुरा समीर सुतार इ. सहावी, श्रमिक विद्यालय चिल्हे येथे दिशा दत्तात्रेय हळदे इ. सहावी व न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी येथे आर्या जयेश मोरे इ. आठवी हे विद्यार्थी आपापल्या शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने ध्वजारोहणाचा बहुमान त्यांना देण्यात आला.
सायकलपट्टूकडून महापुरुषांना नमन
नेरळ गावातील बाल सायकलपट्टू हिरेन राम हिसालके यांच्या सोबत महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यासाठी दहा सायकलपट्टूंनी क्रांतिकारक आणि महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे महत्व पटवून देण्यासाठी या बाल सायकलपट्टूंकडून केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
सकाळी नेरळ पोलीस ठाणे येथे हिरेन राम हिसालके तसेच सुमेध विकास पारधी, आदीन अयाज अत्तार, देवांशी कैलास कुलकर्णी, श्रवण सुरज पारटे, सोजल मंगेश बिराडे, यश लक्ष्मण शिंदे, अथर्व रुपेश रसाल, योगराज लक्ष्मण शिंदे, श्रेया सुरज पारटे, संग्राम अंकुश शेळके या सायकल पट्टूंच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस हजर होते. त्यावेळी प्रभारी अधिकारी शिवाजी धावले यांनी या सायकलपट्टूंना हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संदेश
महाराष्ट्र दिनानिमित्त माथेरानमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरपरिषद प्रांगणामध्ये माथेरानचे मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, माथेरान मधील इंग्रजी माध्यमाची सेंट झेवियर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर पथ नाट्य सादर करून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, कुलदीप जाधव, राजेश दळवी, सुनील शिंदे, सेंट झेवियरचे सर्व शिक्षक वर्ग, नागरीक व पालक यावेळी उपस्थित होते.
उरणमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
महाराष्ट्र दिनानिमित्त उरण तहसील कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. या बलिदानाच स्मरण आणि राष्ट्रध्वजाला वंदन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.