दुहेरी लसीकरणात महाराष्ट्र प्रथम

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. उत्तर प्रदेशने आतापर्यंत पाच कोटी 50 लाख 48 हजार इतके लसीकरण केले असून दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 86 लाख 18 हजार इतकी आहे. तर महाराष्ट्र लसीकरणात दुसर्‍या क्रमांकावर असून आतापर्यंत चार कोटी 75 लाख इतके लसीकरण झाले आहे. मात्र दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र सर्वप्रथम असून एक कोटी 22 लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version