| सोलापूर | प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील सावकारग्रस्त शेतकरी कामगार व श्रमिक वर्गाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान येथे महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे प्रदेशाध्यक्ष बाळा भाबट खादगावकर, नेताजी जाधव, रमेश पाटील खिरकर यांच्या नेतृत्वाखाली 8 व 9 मार्च रोजी आहे. राज्यातील सावकारग्रस्त शेतकर्यांना आपली बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील मिळाला पाहिजे, सावकारग्रस्त शेतकर्यांच्या तक्रारींची तालुका पातळीवरील पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, राज्यातील बचत गटांना, वाहनांना कर्ज वाटप केलेल्या मिक्रोफायनान्स कंपन्याच्या जाचक कर्ज वसुलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व कंपन्या सावकारी कायद्याच्या अधिपत्याखाली आणून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात समिती गठीत करावी, सावकारी कायद्याची सक्षम पाने अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम कायदा अस्थितवात आणावा, सावकारी कायद्यातील त्रुटींमुळे खारीस झालेली प्रकरणे नव्याने चालवावीत व संपूर्ण राज्यातील जिल्हा उपनिबंधक यांच्याशी दुय्यम असणारे व एकाच जिल्ह्यात सतत 4 वर्ष सेवेत असणार्या सहकार विभागातील कर्मचार्यांच्या तडकाफडकी इतर जिल्ह्यात बादल्या कराव्यात आशा विविध मागण्याचा त्यामध्ये समावेश आहे. वरील मागण्याच्या संदर्भात अडचणी असलेल्या सावकारग्रस्त शेतकरी, कामगार व श्रमिक जनतेने आंदोलनास मुंबई येथे हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समिती तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन
