सेरेना, आर्यनकडे नेतृत्वाची धुरा
। मुंबई । प्रतिनिधी ।
अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने दि. 27 ते 30 मार्च या कालावधीत होणार्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले आहेत. मुंबई उपनगराच्या सेरेना म्हसकर हिच्याकडे किशोरी, तर परभणीच्या आर्यन पवार याच्याकडे किशोर गटाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. बिहार मधील गया येथील जी.डी. गोयंका पब्लिक स्कूल येथे मॅटवर हे सामने खेळवले जाणार आहेत. नुकत्याच मनमाड-नाशिक येथे झालेल्या किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला आहे.
किशोरी गट :- सेरेना म्हसकर संघनायिका (मुंबई उपनगर पूर्व), यशश्री इंगोले (परभणी), बिदिशा सोनार (नाशिक शहर), समृद्धी लांडगे (पिंपरी चिंचवड), प्रतिक्षा राठोड (परभणी), सानिका पाटील (सांगली), सेजल काकड े(नाशिक ग्रामीण), तनुजा ढेरंगे (नाशिक शहर), नंदा नागवे (जालना), आर्या लवार्डे (पुणे शहर), सिद्धी लांडे (पिंपरी चिंचवड), ईशा दारोळे (नाशिक शहर).