आई गंभीर जखमी
। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडी शहरातील नायगाव परिसरातही एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. घराच्या छताचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत त्या चिमुकल्याची आईसुद्धा गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शुक्रवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास घडली आहे. भिवंडीच्या नायगाव परिसरातील अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबावर त्यांच्या घराच्या छताचे प्लास्टर कोसळले. या दुर्घटनेत घरात झोपलेली आई व तिचे सहा महिन्याचे बाळ गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शांतीनगर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.