राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

पुण्याचा धीरज लांडगे करणार प्रतिनिधित्व
। मुंबई । प्रतिनिधी ।
सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे, पुणे येथे दि. 14 मे रोजी 15 वर्षांखालील मुली व ग्रीको रोमन मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी 370 कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या पद्धतीने व 16 मे रोजी इचलकरंजी येथे 15 वर्षांखालील फ्री स्टाईल मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी 520 कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या पद्धतीने संपन्न होऊन निवड झालेले कुस्तीगीर 27 ते 29 मे रोजी रांची झारखंड येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

15 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगीरांचे नावे खालील प्रमाणे :
ग्रीको रोमन मुले : 38 किलो- ओंकार कराळे (ठाणे), 41 किलो- आदिल जाधव (कोल्हापूर), 44 किलो- सिद्धनाथ पाटील (कोल्हापूर), 48 किलो – साईनाथ पारधी (ठाणे), 52 किलो- प्रणय चौधरी (ठाणे), 57 किलो- तुषार पाटील (कोल्हापूर), 62 किलो – धीरज लांडगे (पिंपरी- चिंचवड), 68 किलो- सोहमराज मोरे (सातारा), 75 किलो- श्रीधर नाईक (कोल्हापूर), 85 किलो- हर्ष ठाकरे (ठाणे). 15 वर्षाखालील मुली :- 33 किलो – कस्तुरी कदम (कोल्हापूर), 36 किलो- श्रावणी लवटे (कोल्हापूर), 39 किलो- वेदिका शेंडे (सातारा), 42 किलो- गौरी पाटील (पुणे), 46 किलो- संजिवनी ढाणे (सोलापूर), 50 किलो- अहिल्या शिंदे (पुणे), 54 किलो- वैभवी मासाळ (पुणे), 58 किलो- समृद्धी कारंडे (कोल्हापूर), 62 किलो -आयुक्ता गाडेकर (वाशीम), 66 किलो- सायली बुशिंग (कोल्हापूर). 15 वर्षाखालील फ्री- स्टाईल मुले :- 38 किलो – शुभम उगले (ठाणे), 41 किलो प्रणव घारे (कोल्हापूर), 44 किलो- सोहम कुंभार (कोल्हापूर), 48 किलो- रोहित जाधव (उस्मानाबाद), 52 किलो- सुशांत पाटील (कोल्हापूर), 57 किलो- आरू खांडेकर (सातारा), 62 किलो – तनिष्क कदम (पुणे), 68 किलो- अर्जुन गादेकर (वाशीम), 75 किलो- पांडू जुंद्रे (नाशिक), 85 किलो – ओंकार शिंदे (पुणे) यांची निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी सांगितले.

Exit mobile version