। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ केतकीचामळा व गणराज मित्रमंडळ अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्रुती सौरभ भिडे यांनी प्रथम क्रमांक मिळवले तर निर्मला फुलगावकर द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक गीता कळके यांनी मिळवले. महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ व गणराज मित्रमंडळ अलिबाग यांच्या वतीने महर्षि विनोद यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विवेकानंद जयंती व महर्षि न्यायरत्न विनोद जयंती निमित्त जे.ऐस. एम.कॉलेज अलिबाग येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते परंतु गेल्या वर्षा पासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वक्तृत्व स्पर्धा ऐवजी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 127 स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर निबंध पाठविले होते. या निबंधाचे परीक्षण लतिका सुरेंद्र दातार व नीलम जयेश म्हात्रे यांनी केले आहे. यामध्ये श्रुती सौरभ भिडे यांनी लिहिलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणांत जीवन मुल्यांचा त्रास झाला आहे काय? या निबंधास प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक निर्मला फुलगावकर यांनी लिहिलेल्या कोरोना महामारीने मला काय शिकवले? 4 हजार रुपये, तृतीय क्रमांक गीता गजानन कळके यांनी लिहिलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणांत जीवन मूलल्यांचा त्रास झाला आहे काय? या निबंधास 3 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक श्रद्धा गजानन वझे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे या निबंधास 2 हजार रुपये तर पाचवा क्रमांक डॉ. वर्षा देशपांडे यांनी लिहिलेल्या विवाह संस्थेचे भवितव्य निबंधास 1 रुपये मिळवले. सर्व विजेता स्पर्धकांना अॅड. अदिती वैद्य , अॅड. श्रीराम ठोसर, डॉ. सुरेंद्र दातार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.