संगमेश्‍वर मंदिरात महाशिवरात्र साजरी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्‍वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोव्हिड 19 संकटातील शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून मंदिर परिसरात सुरक्षित अंतर ठेवून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले.

पहाटे 5:30 वा. अभिषेक झाल्यावर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येत होते. सायंकाळी 7 वा.मंदिरात नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व अ‍ॅड.राजीव साबळे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. या उत्सवानिमित्त नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजिपचे माजी सभापती अ‍ॅड.राजीव साबळे, उपनगराध्यक्ष सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचा देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. संगमेश्‍वर नगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण जाणवत होते.

Exit mobile version