व्यापारी असोसिएशनने राबविले स्वच्छता अभियान
। माणगाव । प्रतिनिधी ।
स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव संकल्पना नजरेसमोर ठेवून मी माणगावकर म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून माणगाव व्यापारी असोसिएशनतर्फे माणगाव नगरीत स्वच्छता अभियान कार्यक्रम उत्साहात राबविण्यात आला.
माणगाव व्यापारी असोसिएशनतर्फे नवीन एसटी बस स्थानक येथून नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या उपस्थितीत व माणगाव नगरपंचायतीच्या सहकार्याने स्वच्छता अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती अजित तारलेकर,नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समिती सभापती शर्मिला सुर्वे, व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी, विद्यमान अध्यक्ष गिरीश वडके, सचिन शरद देसाई, रमेश जैन, अरुण क्षीरसागर, प्रसाद धारिया, ललित ओसवाल, विक्रांत गांधी, धारिया, अशोक धारिया, जयवंत शेट, संतोष मेथा, संतोष दोशी, निलेश मेथा, मांगिलाल कुमावत, संदीप मेथा आदींसह अनेक व्यापारांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन बाजारपेठेची स्वच्छता केली. माणगाव व्यापारी असोसिएशनने स्वच्छतेसारखा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सर्व व्यापारी वर्गाने तसेच या अभियानात सहभागी ग्रामस्थांचे कौतुक केले. या अभियानात सहभागी झालेल्या माणगावकरांचे प्रतिष्ठित व्यापारी सचिन देसाई यांनी विशेष आभार मानले.