क्रॉस कंट्रीत महात्मा फुले महाविद्यालयाचे यश

मुलींच्या संघाला सुवर्णपदकासह चॅम्पियनशिप; मुलांच्या संघाला रौप्यपदक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या झोन-1 क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्ण व रौप्य कामगिरी करत महाविद्यालयाचा लौकिक कायम राखला. कळंबोली येथील के.एल.ई. महाविद्यालयात 2 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा झाली.

मुलींच्या संघाने सुवर्णपदक मिळवत चॅम्पियनशिप पटकावली. या संघात शिवकन्या मोहनराव ताटे, करीना अनिकेत पवार, आचल शेळके आणि दिया समाधान कोळी यांचा समावेश होता. मुलांच्या संघाने रौप्यपदक मिळवत चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळविले. या संघात राज कमल्या भगत, साहिल श्रीकांत साळुंखे, विभव घरत, सत्यम ठाकूर आणि तन्मय सावंत यांचा समावेश होता. साहिल श्रीकांत साळुंखे याने मुलांच्या गटात रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेतील शिवकन्या मोहनराव ताटे, साहिल श्रीकांत साळुंखे आणि राज कमल्या भगत या तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या विभागीय संघात निवड झाली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. महाविद्यालयाचा जिमखाना विभाग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चमकदार कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, उपप्राचार्य डॉ. सोनू लांडे, डॉ. लक्ष्मण गवळी, उपप्राचार्य व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. सोपान गोवे, ग्रंथपाल सुनील अवचिते, प्रा. प्रवीण गायकर, एन.सी.सी. प्रमुख प्रा. रामदास जमनुके, डॉ. यशवंत उलवेकर तसेच डॉ. लीना मेश्राम, डॉ. रूपश्री कडू, प्रा. अतुल पोखरकर, प्रा. मयूर पाटील आणि प्रा. नयन कोळी यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version