मुरुड कृउबा समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Exif_JPEG_420

शिंदे गटाच्या शिवसेनेची दांडी गुल

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आघाडीपुढे शिंदे गटाच्या शिवसेनेची दांडी गुल झाली आहे.

रविवारी 13 जागांसाठी मतदान मध्ये विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे- योगेंद्र गोयजी, आदेश भोईर, सारिका वाघमारे, संतोष पाटील, मनोज भगत, शरद चवरकर, रमेश दिवेकर, चंद्रकांत कमाने, मनोहर मेहतर, गजानन पाटील, तुकाराम पाटील, विजया दिवेकर, भारती बंदरी हे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नऊ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर ग्रामपंचायत सदस्यांमधून चार सदस्यही महाविकास आघाडीचे विजयी झाल्याने शिवसेनेला एक सुद्धा जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोठी हार शिवसेनेला सहन करावी लागली आहे. राष्ट्रवादी, दोन, ठाकरे गट एक सदस्य तर काँग्रेस  दोन सदस्य निवडून आले आहेत.

विजयी उमेदवारांचे अभिनंदन  माजी आ. पंडित पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा सह चिटणीस  मनोज भगत, तालुका चिटणीस अजित कासार, कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ, राष्ट्रवादी अध्यक्ष मंगेश  दांडेकर, शेकाप नेते मनोहर बैले, तुकाराम पाटील श्रेकांत वारगे, राहील कडू, सचिन पाटील, माजी सरपंच मुश्रत उलडे  आदिंसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Exit mobile version