। माणगाव । प्रतिनिधी ।
महाड विधान मतदारसंघातील कविळवाल येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या विजयाची ग्वाही देत मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
यावेळी स्नेहल जगताप यांनी बोलताना सांगितले की, स्वर्गीय माणिकराव जगताप उर्फ आबासाहेबांचे विचार आपल्याला प्रेरणादायी आहेत. त्याच विचारांना पुढे घेऊन जात त्यांचा वारसा जपत आपण विविध विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याचे आहोत. नवीन रोजगार निर्मिती, नवीन शैक्षणिक संस्थामधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचेही स्नेहल जगताप यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख गजानन अधिकारी, जिल्हा संघटक सुधीर सोनावणे, प्रकाश जाधव, संजय घोसाळकर, प्रमोद जाधव, ज्योती मनवे, योगीता मोरे, प्रभाकर ढेपे, शिवाजी गावडे, वलीद हुजुक, निलेश केसरकर, रणजीत मालोरे, शिवाजी टेंबे, अक्षय कदम, रोहित रातवडकर, समिर टेंबे, नारायण पांचाळ, हुसेन लष्करे, अनिष बामणे, अनुज गोरेगावकर, योगेश बडे, प्रकाश जाधव, विश्वास बागवे, दिनेश बागवे, धर्मा बागवे, हिदायतग जगे, निजामभाई गजगे, लियाकत गजगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.