एकच ध्यास करंजाडेचा महाविकास

। दीपक घरत । पनवेल ।
एकच ध्यास करंजाडेचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पहिल्या पाच वर्षात आम्ही विकासकामे करण्यात यशस्वी ठरलो असल्याने रामेश्‍वर पर्व दोनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, पेपर लेस ट्रांजेक्शन, ऑनलाईन समस्या निराकारण, यासोबत मुबलक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध असल्याचे मत सरपंच आंग्रे यांनी व्यक्त केले आहे. माझी ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत हा विकासमंत्र घेऊन करंजाडे ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी होणार असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार याची खात्री सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी व्यक्त केली आहे.

निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळ क्षेत्रालगत असलेल्या करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत माजी सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे नोकरी धंद्यानिमित्त पनवेल परिसरात वास्तव्यास येणारे नागरिक करंजाडे वसाहतीला प्राधान्यक्रम देत आहेत. माजी सरपंच आग्रे प्रगतीचा वारसा जपण्याला प्राधान्यक्रम देत असल्याने सध्या ते वसाहतीत येणार्‍या प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटत असल्याने शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीचा करंजाडे ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय निश्‍चित मानला जात आहे.


पनवेल पालिका हद्दीपासून हाकेच्या अंतरवर असणार्‍या करंजाडे ग्रामपंचायत परिसराचा विकास झापाट्याने होत आहे. झपाट्याने सुरु असलेल्या विकासकामांमामुळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना भविष्यात येणार्‍या समस्या सोडविण्यासाठी शेकापचे माजी सरपंच रामेश्‍वर आंग्रे यांनी मागील पाच वर्षात भरघोस काम केले आहे.

वसाहतीमधील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरीता स्वछता महत्वाची असल्याने स्वछ करंजाडे, सुंदर करंजाडे यासाठी सरपंच आंग्रे नेहमीच अग्रही असतात. याच सोबत प्लास्टिकमुक्त परिसर हीच पर्यावरण संवर्धनाची गुरुकिल्ली या सुविचारावर सरपंच आंग्रे यांची नितांत श्रद्धा असल्याने सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने आंग्रे यांनी करंजाडे ग्रामपंचायत हद्दीत कापडी पिशव्याचे वाटप करून प्लास्टिकला हद्दपार करण्याची शपथ घेतली आहे.


धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी देखील आंग्रे यांच्याकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीत नेहमीच अखंड कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत हद्दीतील होतकरू तरुणांना उच्च प्रतीचे क्रीडा प्रशिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने साकार मल्टीपल स्पोर्ट्स अकादमीच्या मध्यमातून सरपंच रामेश्‍वर आंग्रे भविष्यातील कीर्तिवंत खेळाडू घडवण्याचे काम करत आहेत.

कला, क्रीडा, मनोरंजन यांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वसाहतीत करंजाडे महोत्सव साजरा करणार्‍या सरपंच आंग्रे यांनी कोरोनासारख्या संकट काळातही सामाजिक भान जपून आपल्या प्राणाची पर्वा न करता नागरिकांना आरोग्य, स्वच्छता, निर्जंतुकीकरण सेवा मिळवून दिल्या. त्याचप्रमाणे या कठीण काळात नागरिकांना सेवा देणार्‍यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्याचे काम देखील ग्रामपंचायत माध्यमातून सरपंच आंग्रे यांनी केले आहे. आंग्रे यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा भरघोस मतांनी विजय होईल, असे मत अनेक ज्येष्ठांनी व्यक्त केले.

भविष्याचे व्हीजन
वारकरी भवन निर्माण करणार
रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी रोजगाराभिमूख प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार.
सामुहिक सोहळ्याकरिता नाममात्र शुल्क आकारणी करणारे समाज मंदिर उभारणार.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणे.
जेएनपीटी रेल्वे मार्गावर अंडरपास रस्ता बनविणे.
परप्रांतीय बांधवांसाठी रेल्वे आरक्षण, तिकीट दुरुस्ती व तत्सम कामांसाठी रेल्वे सुविधा केंद्र सुरु करणे.
सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावणे.
वन रुपी मिनरल वाटर प्लांट सुरु करणे.
रेन वाटर हार्वेस्टिंग प्लांट सुरु करणे.

थेट सरपंच उमेदवार : रामेश्‍वर आंग्रे
वॉर्ड क्र. 1
अंजना कातकरी
योगेंद्र कैकाडी
वॉर्ड क्र. 2
अक्षय गायकवाड
उमेश भोईर
कोमल खिलारे
वॉर्ड क्र. 3
श्रुती गायकवाड
नीता राणे
रुपेश आंग्रे
वार्ड क्रमांक 4
कल्पना गायकर
नीलम भगत
ध्रुव बोरकर

ग्रामपंचायत हद्दीत विकासकामे
सिडकोनिर्मित आरोग्य केंद्र बंद असल्याने तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन आरोग्य केंद्र सुरु केले.
स्मशानभूमीत अंत्यविधी निर्विघ्न पार पडावेत याकरीता शेड, कुंपण आणि पार्थिव कट्टा.
जेष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र.
जिल्हा परिषद शाळेला अतिरिक्त वर्ग आणि बैठक व्यवस्थेकरीता बाकडे मिळवून दिले.
विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे, याकरीता शाळेत पाच हजार लिटरची पाण्याची टाकी बसवून दिली.
पनवेल-उरण महामार्गवरून वसाहतीत प्रवेश करता यावा, याकरीता सिडकोकडे पाठपुरावा करून रस्ते विकसित केले.
वसाहतीमधील प्रमुख ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आल्याने गुन्हेगारीचा स्तर खालावला.
24.50 लाख निधी खर्चून स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी जलकुंभ उभारून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल.
वसाहतीला भेडसावणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी सिडको विरोधात उभारलेल्या लढ्याला यश आल्याने जलवाहिन्यांचे व्यास वाढले.
संवेदनशील तसेच महत्वपूर्ण मुद्दा असलेल्या गावठाण विस्ताराच्या मुद्यावर बैठक घेत विविध घटकांच्या भूमिका मांडण्याचे काम आंग्रे यांनी केले.

Exit mobile version