महावीर जन्मकल्याण दिन

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

मुरुड शहरामध्ये भगवान महावीर जन्मकल्याण दिन उत्सहात साजरा करण्यात आला. भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन परंपरेत असे मानले जाते की 6 व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार मधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलामाता यांचेपोटी क्षत्रिय कुटुंबात झाला होता. त्यांनी 30 वर्षे भारतभर फिरून जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला.

भगवान महावीरांची प्रतिमा सुवर्ण रथात विराजमान करून भव्य मिरवणूक संपूर्ण मुरुड शहरात फिरवण्यात आली. यावेळी जैन समाजाच्या महिला व पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने शामिल झाला होता. मुरुड शहरातील भगवान महावीर मंदिरात अभिषेक कार्यक्रम,पूजा व भक्ती संध्या आरती असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

Exit mobile version