| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरांतील जैन बांधवांनी महावीर जयंती उत्साहात साजरी केली. या निमित्ताने शहरातून महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जैन बांधवांनी ‘जिओ और जिने दो’च्या घोषणांनी कर्जत शहर दणाणून सोडले. जैन बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. तपगच्छाधिपतींचे (तपगच्छ संप्रदायाचे प्रमुख) शिष्यरत्न, परमपूज्य आचार्य श्री विजय रामचंद्रसूरीश्वरजी महाराज यांचे शिष्य, परमपूज्य आचार्य श्री विजय कीर्तियश सूरीश्वरजी महाराज यांच्या आशीर्वादाने मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत चौदा स्वप्नांच्या प्रतिकृतींचे आयोजन करण्यात आले होते. जैन मंदिरापासून निघालेली मिरवणूक बाजारपेठेतून लोकमान्य टिळक चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून छत्री केंद्र मार्गे पुन्हा जैन मंदिराकडे आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कर्जतमध्ये महावीर जयंती साजरी
