विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

। कोर्लई । प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदासनगर वाड्यातील चंद्रकांत नांदगावकर यांच्या घरासमोर असलेला विजेचा खांब गेल्या अनेक महिन्यांपासून सडलेल्या गंजलेल्या अवस्थेत आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयात वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे. मात्र याकडे अधिकारी वर्गाचे अद्यापही दुर्लक्ष असून वेळप्रसंगी याठिकाणी कोणती दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून येथील विजेचे सडलेले गंजलेले खांब तातडीने बदलण्याची मागणी नागरिकांतून होते आहे.

Exit mobile version