। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील जनता अतिशय त्रस्त झाली आहे. थोडासा पाऊस पडला तरी रात्रभर लाईट जाते. या भोंगळ कारभारा विरोधात पत्रकारांनी आज महावितरणच्या अधिकार्याला घेराव घालत जाब विचारला.
नागरिकांचे प्रश्न घेऊन तालुक्यातील सर्व पत्रकारांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त पत्रकारांनी अनेक प्रश्नांचीफैरी झाडल्या असाच प्रकार चालू राहिला तर पत्रकारांच्यावतीने जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला. तालुक्यातील नेतेमंडळी बिनकामाचे असून कुठल्याही प्रकारचे काम जनतेसाठी त्यांच्याकडून होताना दिसत नाही. म्हणूनच महावितरणाचे फावले आहे काय, असा प्रश्न देखील पत्रकारांनी तिथे उपस्थित असलेले उपअभियंता छात्रे यांना केला. प्रत्येक गावावाड्यांमध्ये एक महावितरणाचा लाईनमन हा राहिला पाहिजे. याकरता त्यांना घर भाडे भत्ता दिला जातो. तरी देखील कुठलाही वायरमेन हा गावात राहत नाही. त्या कारणाने एखाद्या गावात लाईट गेली तर रात्र रात्रभर अंधारात राहावं लागतं एन दसर्याच्या वेळेला सुधागड तालुक्यातील लोक अंधारात होते. त्यांना दसरा हा सण अंधारात साजरा करावा लागला. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण असल्याचं सांगितलं. अनेक गावांमध्ये विजेचे पोल वाकले आहेत, काही ठिकाणी गंजलेले आहेत. त्याकडे देखील महावितरण लक्ष देत नसल्याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. एखाद्या फार्म हाऊसमध्ये जर लाईट गेली तर तेथे लाईनमन अर्ध्या तासाच्या आत पोहोचतो आणि लाईट कुरु होते. मात्र, सामान्य माणसांना तात्कळत बसावे लागते. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावेळी पत्रकार अमित गायकवाड, दत्तात्रय दळवी, निशांत पवार, गवस पठाण, परेश शिंदे, मंगेश यादव, विनोद भोईर, प्रशांत हिंगणे, ऑल इंडिया पँथर सेनेचे नरेश गायकवाड ,सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
या ठिकाणी अधिकार्यांनी येणार्या ग्राहकांसोबत सन्मानाने वागावे काही अधिकारी सन्मानाने वागत दिसत नाही असंच जर चालू राहिलं तर यांना जनता काय असते व ती काय करू शकते. हे दाखवून देतील, असे देखील येथील पत्रकारांनी सांगितले.
याबाबत महावितरणाचे उपअभियंता छत्रे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही लवकरच हा प्रश्न निकालात लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भाग असल्याकारणाने वीज केव्हा जाते आणि कुठे जाते हे शोधायला वेळ जातो. मात्र आमचे लाईनमन काम करत असतात. अधिकारी देखील काम करतात, तरी देखील याच्यात अधिक उत्तम काम कसं करता येईल, असे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
