महायुतीच्या कार्यकर्त्यांचा श्रीरंग बारणे यांना विरोध

कार्यकर्ते निवडणुकीपासून राहणार अलिप्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना स्वकीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे असे दिसू लागले आहे. महायुतीत काम करण्यास पळसदरी ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्यांचा निर्णय घेऊन या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे यांना विरध केला आहे. महायुतीचे कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्त राहणार आहेत.

पळसदरी ग्रामपंचायतमधील काही गावात कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांना विरोध आहे. या भागातील कार्यकर्त्यांची कोणतीही कामे आमदाराकडून होत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकमध्ये महायुतीवर बहिष्कार करणार असल्याचे पत्र पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र लिहिले आहे. ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाकडून काही गावामधील कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक दिली जाते.

कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी म्हणून गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ उपोषण, आंदोलन, अर्ज, विनंत्या, बैठका करून झालेले आहे. मात्र महायुतीतील शिंदे गटाचे आमदार काम मुळे राजकीय भावनेने विरोध करीत आहेत. कंपनी प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहेत. आम्ही पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील प्रामुख्याने नांगुर्ले, तिघर येथिल कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत महायुतीचे काम करणार नाही. असा पवित्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील महायुतीचे कार्यकर्ते यांनी एकतर येत हा निर्णय घेतला असून त्या बिआठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात कर्जत पंचायत समिती माजी सदस्र रवींद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस राजेंद्र निगुडकर, कर्जत पंचायत समिती माजी सभापती राकेश मरले, जेष्ठ कार्यकर्ते अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला संघटक पूजा सुर्वे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भरत कदम, युवक तालुका सरचिटणीस रुपेश पवार आदी प्रमुख तसेच 100 हुन अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version