• Login
Monday, November 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महेंद्र थोरवे टोरंटच्या दावणीला; सुधाकर घारे यांचा घणाघात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 2, 2026
in sliderhome, कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
महेंद्र थोरवे टोरंटच्या दावणीला; सुधाकर घारे यांचा घणाघात
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

कर्जतच्या जंगलात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पापूर्वीही दरवर्षी एक लाख वृक्षतोड होते, असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसताना टोरंट प्रकल्पाच्या समर्थनासाठी थोरवेंची धडपड सुरू असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे सायडोंगर, कोतवाल आणि पाली या तीन गावांतील जंगलात टोरंटच्या 3 हजार मेगावॅटच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी 32 हजार 490 झाडे तोडण्याचा आकडा समोर असताना प्रत्यक्षात तीन लाख झाडांवर कुऱ्हाड येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, या वृक्षतोडीच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून थोरवेंना राष्ट्रवादी काँग्रेसवर टोलेबाजी करण्यातच अधिक रस असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केला आहे.

कोणत्याही अधिकृत पुराव्याशिवाय जंगलात दरवर्षी एक लाख झाडे तोडली जातात, असे वक्तव्य करून थोरवे विरोधकांवर टोलेबाजी करतात. दुसरीकडे तीन लाख झाडे तोडली जाण्याची शक्यता असलेल्या टोरंट प्रकल्पाचे उघडपणे समर्थन करतात. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने सर्व नियम पाळून मंजूर केला आहे. हा ग्रीन एनर्जी प्रकल्प असून, यातून आदिवासी युवकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली आहे.

थोरवेंचा घारेंवरही निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसने टोरंट प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला. सत्तेत राहून सरकारच्याच निर्णयाला विरोध करणे योग्य नाही. केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर केलेला प्रकल्प नको असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतून बाहेर पडावे, असे वक्तव्य थोरवे यांनी केले.
प्रसिद्धीसाठी तटकरे आणि घारेंच्या नावाचा जप?
खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांचे नाव घेतल्याशिवाय महेंद्र थोरवेंचा दिवस जात नाही. आमचे नाव घेऊन त्यांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे प्रसिद्धीसाठी ते सतत तटकरे आणि घारे या दोन नावांचा जप करत असतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार सुनील तटकरे यांची कायमच विकासाची भूमिका राहिली आहे. विकासाची भूमिका कायम ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाली. प्रकल्प आले पाहिजेत; पण ते पर्यावरणपूरक असायला हवेत. विकासासोबतच पर्यावरणही तितकेच महत्त्वाचे आहे, हीच सुनील तटकरे यांची भूमिका आहे. राज्यात कोणत्या पक्षाने कुठे राहावे, हे सांगण्यासाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या सल्ल्याची गरज नाही.

धनंजय देशमुख,
प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

खालापूरमध्ये भरपूर कंपन्या असूनही महेंद्र थोरवेंनी इतक्या वर्षांत कोणत्याही स्थानिकाला कायमस्वरूपी नोकरीला लावलेले नाही. आता टोरंट प्रकल्प आल्यानंतर कर्जतमधील स्थानिकांना रोजगार देण्याचे आमिष दाखवत आहेत. थोरवे काय बोलत आहेत, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. दोन-तीन विषय एकत्र करून ते वक्तव्य करतात. थोरवेंना फक्त आणि फक्त कंत्राट हवे आहे. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी ते टोरंट प्रकल्पाचे इतके समर्थन करत आहेत. सह्याद्रीचा विनाश होत असताना सर्वजण या प्रकल्पाला विरोध करत आहेत. थोरवेंना हा प्रकल्प आणायचाच असेल, तर त्यांना माझे सांगणे आहे की, सह्याद्रीचा ऱ्हास करणारा प्रकल्प आम्हाला कोणालाच नको.

सुधाकर घारे,
नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramahendra thorvemarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssudhakar ghare
Previous Post

गोकुळमध्ये महायुतीची कोंडी

Next Post

शेकापच्या संघर्षाला सोशल मीडियाची साथ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रेवस पोर्टस्‌‍‍ कंपनीकडून शर्तभंग!

November 2, 2026
sliderhome

शेकापच्या संघर्षाला सोशल मीडियाची साथ

November 2, 2026
sliderhome

गोकुळमध्ये महायुतीची कोंडी

November 2, 2026
अवकाळीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
sliderhome

अवकाळीने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला

November 2, 2026
उरणची लेक निघाली युवा ऑलिम्पिकला!
sliderhome

उरणची लेक निघाली युवा ऑलिम्पिकला!

November 2, 2026
sliderhome

पत्नीसह मुलीची हत्या करणाऱ्याला जन्मठेप

November 2, 2026
Next Post

शेकापच्या संघर्षाला सोशल मीडियाची साथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?