गटविकास अधिकारी पोळ यांचे आवाहन
| म्हसळा | वार्ताहर |
दीपावली सणाचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील वरवठणे जि.प. गटातील ग्रामपंचायत खामगाव येथील आई महिला ग्रामसंघामार्फत श्री श्रद्धा महिला बचत गट खामगाव यांच्या विद्यमाने पंचायत समिती म्हसळा येथे दीपावली फराळ स्टॉल आणि विक्री केंद्र लावण्यात आले आहेत.
सदर विक्री केंद्रास गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी भेट देऊन या महिला गटाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, महिला बचत गटाचा हा स्तुत्य उपक्रम असून, तालुक्यातील महिला बचत गटाने असे उपक्रम राबवून बचत गट सक्षम होण्यास मदत करावी. ग्राहकांनी महिला बचत गटाच्या व्यवसायाना प्राधान्य देऊन बचत गट अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी केले.
याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश साळी, माजी सभापती छाया म्हात्रे, कक्ष अधिकारी हिरामण इंदुलकर, ओ.एस. हेमंत माळी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी.एन. दिघीकर, प्रभाग समन्वयक ज्ञानेश्वर गोरटे, दवटे अण्णा, म्हात्रे, स्टॉल चालक रितिक राजू विचारे, अश्विनी सावंत, रसिका खडस आदी मान्यवर आणि पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.