सरपंचपदी शैलेश माळी
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवाराने निसटता विजय मिळवला आहे. 11 सदस्य असलेल्या खेरणे ग्रामपंचायतीवर शेकापचे सहा सदस्य निवडून आले आहेत. भाजप पुरस्कृत पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार शैलेश बाळाराम माळी हे 88 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 514, तर शेकापचे हरिश्चंद्र हशा म्हात्रे यांना 429 मते मिळाली.
तसेच रुपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी, अशोक गणपत गोंधळी, सुभद्रा संतू माळी, अक्षता सचिन पाटील हे भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले. शेकाप-मनसेचे कैलास माळी, ज्योती दीपक गोंधळी, स्वाती भास्कर पाटील, विशाल लक्ष्मण माळी, प्रमिला संतोष गोंधळी, प्रमोद नामदेव माळी हे सहा सदस्य विजयी झाले आहेत.