माथेरान नगरपरिषदेत येणार महिला राज

। माथेरान । वार्ताहर ।
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षणाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.13) जून रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेच्या स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात प्रभागांचे आरक्षण आणि सोडत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्वच पक्षांचे पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.
या प्रसंगी माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी पीठासीन अधिकारी अजित नैराळे यांच्या आदेशानुसार आरक्षण सोडत सुरू केली. इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या प्रणव संतोष ढेबे या लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते 4,5,6 या प्रभागांसाठी चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण 7, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1 असे एकूण 10 महिलांचा समावेश असणार आहे.
त्यानुसार प्रभाग सदस्यांसाठी प्रभाग क्रमांक 1 अ सर्वसाधारण महिला तर ब साठी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 अ अनुसूचित जाती महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 अ अनुसूचित जाती तर ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 अ अनुसूचित जाती महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 अ अनुसूचित जमाती महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण असे जाहीर करण्यात आले आहे. या प्रसंगी माथेरान मधील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version