महिंद्रा पिकअप गाडीची चोरी 

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल जवळील चिंचपाडा गाव येथे विठ्ठल मंदिराच्या बाजूला असलेल्या चार चाकी वाहनांच्या बॉडी शॉपच्या दुकानातून महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. अशोक कुमार शर्मा यांच्या दुकानात काम करण्यास आलेल्या 2 लाख रुपये किमतीच्या सफेद रंगाच्या महिंद्रा कंपनीचा पिकअप याची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  

Exit mobile version