| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व यशवंतनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंतामणी उर्फ गिरीश जोशी यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित मुरुड तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धेत मजगावच्या संघर्ष क्रीडा मंडळाने अंतिम फेरीत आदाड गावच्या गुरुमाऊली संघाचा एका गुणाने पराभव करीत ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेत तिसरा क्रमांक वाळवटी गावच्या शिवशंभो क्रीडा मंडळाने, तर कोर्लंईच्या माऊंट कार्मेल संघाने चौथा क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू संघर्षचा रोजित माळी, उत्कृष्ट चढाई संकेत पाटील, उत्कृष्ट कोपरा रक्षक डेरल पेन्ना, उत्कृष्ट पकड मयूर घरत यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण चिंतामणी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे, अॅड. इस्माईल घोले, मनोज भगत, अजित कासार, भाई सुर्वे, मुख्याध्यापक उत्तम वाघमोडे, पर्यवेक्षक श्रीधर ओव्हाळ, मदन हणमंते, मोहन पाटील, संतोष बुद्रुक, दत्तात्रय खुळपे, सागर राऊत, अनंत पाटील, सचिन पाटील तसेच मंडळाचे सदस्य व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील कबड्डीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.