रायगड पोलिस दलात मोठे फेरबदल

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकार्‍यांच्या राज्यांतर्गत बदल्या नुकत्याच झाल्यानंतर रायगड पोलिस दलाचे प्रमुख पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी आता पुन्हा एकदा जिल्हांतर्गत मोठया प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. 28 पोलिस अधिकार्‍यांमध्ये 14 पोलिस निरीक्षक तर 13 सहायक पोलिस निरीक्षक आणि एका परिविक्षाधीन महिला पोलिस उपनिरीक्षक यांची वेगवेगळया ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केरुभाई दत्तात्रय तथा के. डी. कोल्हे यांची नियंत्रण कक्ष येथे तात्पुरत्या स्वरुपात संलग्न बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाड शहर येथील पोलिस निरीक्षक शैलेश दत्तात्रय सणस यांची प्रभारी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असणार्‍या पोलिस निरीक्षक शिरीष कृष्णात पवार यांची खोपोली पोलीस ठाण्यात प्रभारी निरीक्षकपदी, पोलिस निरीक्षक देवेंद्र रामचंद्र पोळ यांची सायबर क्राईम पोलिस ठाणे येथे तात्पुरत्या स्वरुपात, पोलिस निरीक्षक अनिल लक्ष्मण लाड यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारी निरीक्षक पदी, राजेंद्र पांडुरंग पाटील यांची जिल्हा वाहतूक शाखा महाड विभाग, मिलिंद प्रल्हाद खोपडे यांची महाड शहर पोलिस ठाणे प्रभारी पदी, प्रकाश मारुती सकपाळ यांची वाचक शाखेत, पोलिस निरीक्षक गोविंद भगवान ओमासे यांची तळा पोलिस ठाण्यात, पोलिस निरीक्षक संजय पंडित पाटील यांची रोहा पोलिस ठाण्यात, महिला पोलिस निरीक्षक सुवर्णा प्रसाद पत्की यांची सायबर क्राईम पोलिस मधून कर्जत पोलिस ठाण्यात, तर कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण रखमाजी भोर यांची जिल्हा वाहतूक शाखा पनवेल विभागात, तळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गणपत गेंगजे यांची रायगड नियंत्रण कक्षात, पोलिस निरीक्षक तानाजी महादेव नारनवर यांची गुन्हे शाबिती शाखेतून नागोठणे पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये नियंत्रण कक्ष रायगड येथे कार्यरत असणार्‍या गणेश व्यंकटराव कराड यांची खालापूर पोलीस ठाण्यात, हरेश बाळकृष्ण काळसेकर यांची खोपोली पोलिस ठाण्यात, मनोज दत्तात्रय गुुंड यांची रसायनी पोलिस ठाण्यात, मारुती शंकर आंधळे यांची खोपोली पोलिस ठाणे, पवनकुमार गोपाळ ठाकूर यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड, चंद्रकांत गणपत लाड यांची महाड शहर पोलिस ठाणे, अविनाश बाबासाहेब घरबुडे यांची खोपोली पोलिस ठाण्यात तर नेरळ पोलिस ठाण्यातील संजय शांताराम बांगर यांची माथेरान पोलिस ठाणे, वाचक शाखेतील राजीव सर्जेराव पाटील यांची मांडवा सागरी पोलिस ठाणे, नागोठणे येथील विजयकुमार अजितराव देशमुख यांची गुन्हे शाबीती शाखा रायगड, कर्जत पोलिस ठाणे येथील संदिपान महादेव सोनवणे यांची अर्ज शाखा रायगड येथे नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे समाधान कक्षाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. माथेरानेच प्रशांत तुळशीराम काळे यांची पेण पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सहायक पोलिस निरीक्षक सुनिता शंकर अथणे यांची गुन्हे शाबिती शाखा रायगड येथून कर्जत पोलिस ठाणे तर तसेच परिविक्षाधीन महिला पोलिस उपनिरीक्षक दिपाली परशुराम खाडे यांची महाड शहर पोलिस ठाणे येथून मांडवा पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version