क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अलिबागचे नाव मोठे करा – आ.जयंत पाटील

नवेदर बेलीत कबड्डी स्पर्धा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिक्षण,कला,क्रीडा आदी क्षेत्राच्या माध्यमातून अलिबागचे नावं मोठे करा,असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी नवेदर बेली येथे केले. नवेदर बेली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्व.सुरेखा बाळाराम पाटील स्मृती चषक व जय बजरंग क्रीडा मंडळाच्यावतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्यावेळी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित करताना आम.जयंत पाटील यांनी अलिबाग तालुक्यात क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे काम शेकापने नेहमीच जोपासलेले आहे.विविध क्रीडा संघटनांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत.त्यामुुळे तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास होत आहे.भविष्यातही हा कला,क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा,यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत चरीच्या जय हनुमान संघाने प्रथम,कोपरपाडाच्या श्री विठ्ठल संघाने द्वितीय,रोह्याच्या जय बजरंगने तृतीय तर पांडबादेवी,रायवाडी संघाने चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस जिंकले. स्पर्धेत चरीच्या जय हनुमान संघाचा बिपिन थळे याला उत्कृष्ट खेळाडू,रोह्याच्या जय बजरंग संघाचा राकेश गायकवाड याला उत्कृष्ट चढाई आणि कोपरपाड्याच्या श्री.विठ्ठल संघाचा सचिन पाटील याला उत्कृष्ट पकड पुरस्कार जाहीर करण्यात आला.स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version