केटीएसपीप्रमाणे अन्य संस्थाही अत्याधुनिक बनवा; आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यालय अत्याधुनिक झाले आहे. या कार्यालयाप्रमाणे तालुक्यातील अन्य सहकारी संस्थाही अत्याधुनिक झाल्या पाहिजेत, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. अडचणीत असलेल्या संस्थेला योग्य दिशा दाखवत प्रगती पथावर घेऊन जाणार्‍या संस्थेच्या पदाधिकार्‍यांचेही त्यांनी कौतुक केले.

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. जयंत पाटील यांनी मंगळवारी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. ही संस्था अडचणीत असताना आपण संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यालय अत्याधुनिक झाले आहे. या कार्यालयाप्रमाणे तालुक्यातील अन्य सहकारी संस्थाही अत्याधुनिक झाल्या पाहिजेत असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, राजू अभाणी, दिनेश गुरव, अविनाश तावडे, संदीप पाटील, विनोद जाखोटीया, शांताराम पाटील, दिलीप पोरवाल यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version