| पनवेल | प्रतिनिधी ।
खारघर परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच आठ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी याप्रकरणी सूरजकुमार रामजितसिंग (33) याला अटक केली आहे.
सूरजकुमार हा संबंधित इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. त्याच इमारतीतील आठ वर्षीय चिमुरडी इमारतीजवळ खेळत असताना त्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सूरजकुमार रामजितसिंग याला अटक केली. पुढील तपास खारघर पोलीस करत आहेत.






