मुख्य रस्त्यावर मॅनहोल

| उरण । वार्ताहार ।

प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्क्यांच्या भूखंडावर सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेल्या द्रोणागिरी नोडच्या मुख्य रस्त्यावर मॅनहोल निर्माण झाला असून या रस्त्यावसरून जाणार्‍या मोटार सायकल, पादचरी,यांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सिडकोने द्रोणागिरी नोडचा विकास बिल्डरच्या माध्यमातून करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे याठिकाणी निर्माण होणार्‍या वसाहतीमध्ये रहिवासी मोठ्या प्रमाणात राहण्यास आले आहेत. रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठेकेदारांच्या माध्यमातून येथील गटारे रस्ते विकसित करत आहेत. आताच काही महिन्यांपूर्वी या सेक्टर 47 ते नवीन शेवा कडील रस्ता आणि गटारांची कामे नव्यान करण्यात आली आहेत. मात्र या नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटून धोकादायक मॅनहोल निर्माण झाला आहे. या मॅन होलमुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो. मात्र या बाबीकडे अधिकार्‍यांना बघायला वेळच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version