| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील द्रोणागिरी नोड सिडकोकडून विकसित करण्यात येत आहे. भविष्यातील वाढते नागरीकरण पाहता कचरा भूमीसाठी सेक्टर 51 मध्ये भूखंड आरक्षित केला आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायती आणि द्रोणागिरी वसाहतीचा कचर्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या भूखंडावर गाड्या जाण्यासाठी रस्ता, गवत साफसफाई केल्यानंतर कचरा टाकण्यासाठी खुला केला जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
तालुक्यात नव्याने निर्माण होत असलेल्या द्रोणागिरी वसाहत आणि येथील काही ग्रामपंचायतीच्या कचर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जात होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत होते. त्यामुळे या समस्येवर उपाय करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे.
कोणत्याही ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा सिडकोला उचलावा लागून चौल येथील डंम्पिंग ग्राऊंडवर न्यावा लागायचा. यासाठी मागणीनुसार कचर्याला प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागत नाही, तोपर्यंत द्रोणागिरीमधील सिडकोच्या सेक्टर 51 मधील भूखंड दिला आहे.
जी. डी. म्हस्के
स्वच्छता विभाग अधिकारी,
द्रोणागिरी नोड, सिडको