वाकण | वार्ताहर |
अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करुन तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सर्वेश संतोष पवार (वय 18) रा. मांडवशेत आदिवासी वाडी, पो. ऐनघर, ता. रोहा या आरोपीवर पॉस्को कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपीला मंगळवारी(दि.24) रोहा येथील फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.त्यावेळी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सर्वेश पवार याने तिच्याशी प्रेमसंबध ठेवले. तसेच तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन या मुलीस 5 ते 6 महिन्यांची गर्भवती ठेवली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.