प्रवेशद्वारास डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
| कर्जत | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषद हद्दीत विविध योजनांच्या फंडातून सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 79 लाख 36 हजार 605 रुपये खर्च करून प्रवेशद्वार बांधणे, विशेष रस्ता अनुदानातून 7 लाख 22 हजार 716 रुपये खर्च करून मुद्रे येथील गणपती घाट लगतचा रस्ता करणे, 12 लाख 69 हजार 547 खर्च करून मुद्रे खुर्द गावामधील स्मशानभूमी तयार करणे व किता हाऊस बांधणे, 93 लाख 71 हजार 117 रुपये खर्च करून दहिवली येथील जिजामाता उद्यान येथील भिंती चित्र (शिवसृष्टी गार्डन उभारणे), 27 लाख 3 हजार 488 रुपये खर्च करून साईनगर दहिवली येथील उद्यान विकसित करणे, 29 लाख 66 हजार 167 रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज नगर दहिवली येथील उद्यान विकसित करणे, विशेष रस्ता अनुदानातून 38 लाख 10 हजार 414 रुपये खर्च करून संजय नगर येथील शिवाजी दाभणे ते शिरसागर टेलरपर्यंतचा रस्ता काँक्क्रिटीकरण करणे व गटार बांधणे, 19 लाख 90 हजार 372 रुपये खर्च करून बाम चा मळा आकुर्ले गावातील अंतर्गत गटारे व रस्ता काँक्रिटीकरण करणे, तसेच 30 लाख 21 हजार 832 रुपये खर्च करून मुस्लिम दर्गासभोवती सुशोभिकरण करणे या अशा एकूण सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वारास महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याच्या प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.आ. महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, गटनेते नितीन सावंत, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, महिला व बालकल्याण समिती सभापती संचिता पाटील महिला व बालकल्याण उपसभापती प्राची डेरवणकर, मागासवर्गीय कल्याण विशेष समिती वैशाली मोरे, नगरसेविका डॉ. ज्योती मेंगाळ, भारती पालकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, पुष्पा दगडे, नगरसेवक विवेक दांडेकर, संकेत भासे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रीसदस्य आणि कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.