उपजिल्हा रुग्णालयात माणूस चावल्याचीही नोंद

| पनवेल | वार्ताहर |

शासकीय रुग्णालयात विविध व्याधींवर उपचार होत असतो. यांसह सर्पदंशासह विविध प्राणी चावल्याच्या घटना घडत असतात. यामध्ये कुत्रा, मांजर, माकड आदींसह माणसाचादेखील समावेश आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

चालू वर्षात असंख्य घटनांची नोंद उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. यामध्ये माणुसही माणसाला चावल्याच्या घटना घडल्या आहेत. पनवेल मधील विविध घटनेत 940 जणांना कुत्रे चावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 44 जणांना माकडांनी तर 23 जणांना विंचु चावल्याचे समोर आले आहे. 98 जणांना साप चावला असल्याचे समोर आले आहे. मात्र पनवेलमध्ये तब्बल 7 घटनांमध्ये माणूसच माणसाला चावल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक हिंसाचारातून या घटना घडत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Exit mobile version