मांडला मराठी शाळेमुळेच मी घडलो: रोहेकर

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील मांडला येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मांडला मराठी शाळेमुळेच मी घडलो, असे उद्गार माजी विद्यार्थी तथा पनवेल येथील नर्सरी व्यावसायिक दिलीप रोहेकर यांनी शाळेचे ऋण व्यक्त करताना काढले. शाळेतील व अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मांडला शाळेतील सर्व विद्यार्थी आणि अंगणवाडीतील मुलांसाठी वही, पेन, पेन्सिल हे शैक्षणिक साहित्य, सरस्वतीची मूर्ती, मार्बल्सचे पूजाघर, नकाशा सुशोभीकरणासह थोर पुरुषांच्या आकर्षक फोटोफ्रेम आदी भेटवस्तू त्यांनी दिल्या. दिलीप रोहेकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच ऋतिक नागोटणेकर, मुख्याध्यापक समीक्षा नांदगावकर, देणगीदार माजी विद्यार्थी दिलीप लक्ष्मण रोहेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अपर्णा नागावकर, शिक्षणतज्ज्ञ सुरेश नांदगावकर, पदवीधर शिक्षक महेश कवळे, रमाकांत ठाकूर, अस्मिता भगत, निकिता रोहेकर, प्रदीप जाधव, विलास ठाकूर, मधुरा पालवणकर आणि शाळेच्या सर्व विद्या

Exit mobile version