मांडला नदी झाली गाळमुक्त पावसाळ्यात ग्रामस्थांना दिलासा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी पावसाळ्याच्या पाश्‍वर्र्भूमीवर मुरुड तालुक्यातील मांडला गावाला उद्भवणारा संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन नदीतील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरु केले आहे.
ग्रामीण भागातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने मांडला गावाला उद्भवणार्‍या संभाव्य पूराच्या पार्श्‍वभूमीवर गावाला दिलासा मिळाला असून प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन बैठकीत नदीतील गाळ उपसा कामाबाबत समाधान व्यक्त करुन पुढील कामाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व नदीतील उर्वरित राहिलेला गाळ काढण्यासाठी शासनस्तरावर योग्य ते सहकार्य केले जाईल, असे सांगितले. या बैठकीत तहसिलदार रोहन शिंदे, सरपंच सुचिता पालवणकर, उपसरपंच राजेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.
मांडला नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गावाला पूराच्या पाण्यामुळे नुकसानीला तोंड द्यावे लागले होते.या नदीतील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुचिता सुरेश पालवणकर यांनी अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी प्रशांत ढगे व तहसिलदार रोहन शिंदे यांच्याकडे निवेदन देवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
या कामाबाबत मागील ग्रामसभेमध्ये असगर दळवी यांच्या सूचनेनुसार मांडला गावच्या सरपंच सुचिता पालवणकर, उपसरपंच राजेश पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी तातडीने दखल घेवून ग्रामपंचायत स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन कामाला तात्काळ सुरुवात केली, आजही हे काम गतीने प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आमदार महेंद्र दळवी,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार रोहन शिंदे व रोहा-कोलाड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.धाकतोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
अशाच प्रकारे तालुक्यातील उसरोली व आदाड या ठिकाणी सरपंच मनीष नांदगावकर व श्री.अनवारे यांच्या सहकार्याने नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार रोहन शिंदे यांनी दिली आहे. मांडला नदीतील गाळ काढण्यासाठी येथील प्रकल्प विकासक तैजून निसार हन्सोजी यांनी सरपंच सुचिता पालवणकर यांच्या विनंतीवरून लागणारी यंत्रसामुग्री नदीपात्र साफ होईपर्यंत विनामोबदला उपलब्ध करून दिली असून भविष्यात यापुढे काम पूर्ण होईपर्यंत योग्य ते सहकार्य देण्याची खात्री हन्सोजी यांच्यावतीने जाहीद कादीरी यांनी दिली आहे.
या गाळ उपसा कामाच्या पाहणीच्या वेळी सदस्य धर्मेंद्र गायकवाड, बशीर गोरमे, सुहासिनी थळे, दिशा नांदगावकर, गीता नागोटकर, अपेक्षा पालवणकर, फौजिया शेख, अनुसया नाईक, कर्मचारी वृंद,असगर दळवी,म.सईद पंचूलकर, खलिल नाईक,शादाब घय्ये, एजाज दळवी, निसार नाईक, शैलेश रातवडकर, सुरेश पालवणकर,सलीम तांडेल,मजीद दळवी, महेंद्र कदम,शबाब दळवी, निसार दळवी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version