पनवेल येथे मंगळसूत्राची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
रिक्षात बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण मोटारसायकलवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. वासंती विजय कदम (वय ५८) रा. करंजाडे या त्यांचे पती व सुने सोबत औषधे घेण्यासाठी रिक्षातून शहरातील वेलनेस मेडिकल येथे थांबल्या होत्या यावेळी दोन इसम मोटारसायकल वरून तेथे आले व रिक्षा चालकास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत जवळपास ५५००० रुपये इतकी आहे ते खेचून मोटारसायकलवरून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पुडंगील तपास सुरु आहे.

Exit mobile version