माणगाव राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी – नितीन वाढवळ

। माणगाव । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदार संघाचे खा.सुनील तटकरे यांच्या आदेशाने माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नगरीचे माजी नगरसेवक नितीन शिवाजी वाढवळ यांची नियुक्ती माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुभाष केकाणे यांनी करून तशा आशयाचे नियुक्तीपत्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते व खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, ज्येष्ठ नेते शेखर देशमुख, तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप जाधव, संदीप खरंगटे, तालुकाध्यक्षा संगीता बक्कम यांच्या उपस्थितीत माणगाव येथे गांधी मेमोरियल हॉल याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या परिवार संवाद कार्यक्रमात नितीन वाढवळ यांना देण्यात आले. नितीन वाढवळ यांची माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version