माणगाव निकम इंग्लिश स्कुलचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के

अनुष्का जैन 98.20 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

। माणगाव। वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शाळांत परीक्षेचा निकाल सोमवार (दि.27) मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत माणगाव येथील एस.एस.निकम इंग्लिश स्कुलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला असून अनुष्का दिलीप जैन या विद्यार्थिनीने 98.20 टक्के इतके गुण संपादन करून शाळेमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.

या शाळेमधून अनुष्का पांडुरंग उभारे या विद्यार्थिनीने 97.20 टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक, कु. सनप्रीतसिंग वीरेंद्रसिंग बर्मन या विध्यार्थ्यांने 96.60 टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक, श्रावणी प्रफुल्ल गवळी या विद्यार्थिनीने 96.40 टक्के इतके गुण संपादन करून चतुर्थ क्रमांक तर कु. मंथन अरुण फराडे या विध्यार्थ्यांने 96.20 टक्के इतके गुण संपादन करून पाचवा क्रमांक पटकावत शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी एकूण 119 विद्यार्थी बसले होते हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 103 विध्यार्थ्यानी विशेष प्राविण्य संपादन करून 13 विध्यार्थी प्रथम श्रेणीत तर 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचा दरवर्षी निकाल उंचावत असल्याने पालकवर्गांमधे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मदन निकम, सर्व पदाधिकारी तसेच एस.एस.निकम इंग्लिश स्कुल माणगावच्या प्राचार्या,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक, शाळेचे को-ऑर्डिनेटर, सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version