। माणगाव । वार्ताहर ।
दहावीच्या निकालात यंदाही माणगाव येथील एस.एस. निकम इंग्लिश स्कुलने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावीचा परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून, झेटम हुमेरा मुबिन अहमद या विद्यार्थिनीने 97.00 टक्के गुण संपादन करून कॉलेजमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
या शाळेमधून अनुष्का विनोद देशमुख 93.60 टक्के गुण संपादन करून द्वितीय, तर अक्षत निलेश चव्हाण या विद्यार्थ्याने 92.60 टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षेसाठी यावर्षी एकूण 132 विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 7 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करून विशेष श्रेणीत 57 विद्यार्थी असून, प्रथम श्रेणीत 45 तर द्वितीय श्रेणीत 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच एस.एस.निकम इंग्लिश स्कुल माणगावच्या प्राचार्या, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शाळेचे को-ऑर्डिनेटर, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.