| माणगाव | सलीम शेख |
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जागांच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ७:३० वा. यावेळेत सुरुवात झाली.मात्र येथील वार्ड क्र.१५ मधील जुनी पंचायत समिती कार्यालय माणगाव परिसरातील उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय केंद्रातील मतदान मशिनित बिघाड झाल्याने याठिकाणी तब्बल पाऊण तास उशिराने दुसरी मशीन आणून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.याबाबत या वार्डातील माणगाव विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत अशोक साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून वेळ वाढवून देण्याची मागणी केली.याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी माणगाव नगरपंचायत प्रशाली जाधव दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले ते यंत्र आहे ,कधीही काहीही त्यामध्ये होऊ शकते तरीपण आपण काही वेळात दुसरी मशीन उपलब्ध करून दिली.तोपर्यंत मतदार त्याठिकाणी उभे होते.दुपारनंतर तर तेथील मतदान केंद्रावर तेवढी गर्दी देखील नव्हती .असे त्यांनी सांगितले.माणगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी बाजारपेठेत सर्वत्र विविध पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी सर्वत्र सकाळपासूनच गजबज दिसत होती.सकाळी १० ते ११ या वेळेत मतदारांच्या रांगा मतदानासाठी लागल्या होत्या.दुसरं दुपार झाल्यावर मतदारांची गर्दी मतदान केंद्रावर कमी झाली.यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त माणगावात तैनात ठेवण्यात आला होता. माणगावात कुठेही अनुचित प्रकार न घडता सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले.
माणगाव: वॉर्ड क्र.१५ मध्ये मशीन बिघाडामुळे १ तास उशिरा मतदान सुरू
