मंगेश परुळेकरांचा गौरव

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेलचे उद्योजक मंगेश परुळेकर यांना गोवा येथे झालेल्या सारस्वत चेंबर्स कार्यक्रमात सारस्वत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सारस्वत रत्न हा पुरस्कार पनवेल मधील ओरायन मॉल व ऐंपी बिल्डर्सचे मालक मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा येथील सिन्नपूरुष हॉल येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार मंगेश परुळेकर यांना प्रदान करण्यात आला. मंगेश परुळेकरांनी अनेक समाजऊपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये बापदेव वाडी गाढेश्‍वर येथे आदिवासी पाड्यावर तसेच खांदा कॉलनीतील अनाथ आश्रमात शिधा वाटप, पंखे वाटप व सहभोजन दिले आहे. याचबरेबर त्यांनी ओरायन मॉल येथे रक्तदाना शिबीर देखील भरवले होते. यात विक्रमी 166 बाटल्या रक्त संकलन केले होते.

Exit mobile version