कार्लेखिंडीत मुरुडहून मुंबईला जाणारा आंब्याचा ट्रक पलटी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुडहून मुंबईकडे आंब्याच्या पेट्या घेवून जात असलेला आंब्याच्या पेट्यानी भरलेला ट्रक अलिबाग पेण मार्गावरील कार्ले खिंडीत अपघात होवून पलटी झाला. या अपघातात कोणी जखमी झाला नसला तरी ट्रकचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे सकाळच्या सुमारास कार्लेखिंडीत वाहतुकीची कोंडी झाली होती.

शनिवारी सकाळी मुरु हून आंब्याच्या पेट्यानी भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंडीत आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक सुदैवाने बचावला मात्र ट्रकचे नुकसान झाले. दुसऱ्या ट्रक मधून आंब्याच्या पेट्या बाहेर काढण्यात आल्या. या अपघातामुळे अलिबाग पेण मार्गावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र वाहतूक विभागाचे सहायक फौजदार गौरख लवटे यांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून मार्ग मोकळा केला

Exit mobile version