। पनवेल । वार्ताहर ।
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शेतकर्यांची मनं दुखावली गेली आहेत. त्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक व उपमहानगर संघटक आत्माराम गावंड, रामदास गोंधळी, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, संतोष गोळे, अनिल तेळवणे, किरण सोनावणे, कुणाल कुरघोडे, महेश गुरव, विलास कामोठेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.