गुगल ट्रेंडवर मनीष तिवारींचे मनमोहन सरकारवरील आरोप चर्चेत

। अलिवाग । वर्षा मेहता ।
काँग्रेससाठी आणखी एक पेच निर्माण करताना, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी यांनी मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकार नरमल्याची टीका केली आहे. सध्या त्यांचे 10 फ्लॅश पॉइंट्स; 20 इयर्स -नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इम्पॅक्टेड इंडिया या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामध्ये तिवारींनी मनमोहन सरकारवर टिका केली आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर सरकार संयमाच्या नावाखाली सौम्य झाले होते; जे ङ्गशक्तीफचे नाही तर मकमकुवतपणाफचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
26/11 चा हल्ला हा 2008 मध्ये घडला. दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ल्यांची मालिका केली होती. पाकिस्तान-आधारित एलईटी दहशतवाद्यांनी मुंबईत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात 150 हून अधिक ठार आणि अनेक जखमी झाले होते. सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले, तर अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले. 2012 मध्ये त्याला फाशी देण्यात आली होती.
दरम्यान, तिवारी यांच्या पुस्तकावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे काँग्रस पुन्हा एकदा वादात अडकली आहे.

Exit mobile version