| पनवेल | वार्ताहर |
पनवेल बार असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक बुधवारी घेण्यात आली. या निवडणुकीत अॅड. मनोज भुजबळ यांच्या पॅनेलने 11 उमेदवार उभे केले होते. यापैकी अॅड. सुशांत घरत हे बिनविरोध निवडून आले होते. मतदानाच्या वेळी पहिल्या फेरी पासूनच भुजबळ आघाडीवर होते व ते भरघोस मताने विजयी झाले. तसेच सचिवपदासाठी प्रल्हाद खोपकर, उपाध्यक्षपदासाठी संदीप जगे, सहसचिव- सीमा भोईर, खजिनदार- धनराज तोकडे, तर सदस्यपदासाठी प्रगती माळी, अमित पाटील, भूषण म्हात्रे हे विजयी झाले.
या निवडणुकीचे कामकाज मुख्यनिवडणूक अधिकारी म्हणून अॅड. एच.जे. शेळके यांनी पहिले त्याचप्रमाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून शशिकांत म्हात्रे, राजेश पाटील, जगदीश ठाकूर, राजेश खंडागळे, विकी दुसिंग, दक्षता पूनकर, त्रिवेणी भगत, सोमनाथ पाटील, कल्पेश कांबळे, संदीप मुंडकर, ज्ञानेश्वर पाटील, नितीन पाटील, प्रणित मालगुडकर यांनी कामकाज पाहिले.