मनोज जरांगेचा आंदोलनाचा इशारा

दुपारपर्यंत रास्तारोको त्यानंतर गावागावातं धरणं आंदोलन करा

| मुंबई | प्रतिनिधी |

आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे सरकार अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्याच्या राजांना दया ना माया दिसते. सध्या राजा तीन-तीन आहेत. पूर्वी एकच राजा असायचा आणि तोच न्याय द्यायचा. पण आता न्याय आपल्याला मिळणार नाही. एवढं मोठं आंदोलन करुन सरकार दुर्लक्ष करत आहे.

आंदोलन हिंसक होणार नाही
जरांगे पाटील यांनी आंदोलन काहीसे शिथिल केले आहे. यावर ते म्हणाले की, आपल्याच समाजातील विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे थोडा आंदोलनात बदल करण्यात आला आहे. आजच्या दिवशीच फक्त रास्तारोको होईल. त्यानंतर केवळ धरणे आंदोलन होईल. सरकार आंदोलकांना संपवू पाहात आहे, पण मी शेवटपर्यंत लढणार, असं ते म्हणाले.

सरकारचा रडीचा डाव
आम्ही सलाईनवर जगत आहोत. आता 14-15 दिवस झाले. जबाबदारी सरकारची आहे. जनता बिथरल्यास दुसरं काय करणार. सरकार रडीचा डाव खेळत आहे. बळेच १० टक्के थोपत आहात. ही दादागिरी आहे. उद्या सगळं मी समजासमोर मांडणार आहे. माझा डाव सरकारला हाणून पाडायचा आहे, त्यामुळे आम्ही फक्त डाव बदलला आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

Exit mobile version