मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली; उपोषणावर ठाम

| वडीगोद्री | वृत्तसंस्था |

राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन सगे-सोयरे बाबत कायदा पास करावा या करीता शनिवारी (दि.10) पासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे. मंगळवारी (दि.13) विभागीय आयुक्त महसूल मधुकरराजे आर्देड, जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ, नारायण गडाचे मंहत शिवाजी महाराज यांनी भेट देऊन जरांगे यांना पाणी घेणे व वैद्यकिय उपचार घ्यावा करीता विनंती केली. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जरांगे यांचा बुधवारी (दि.14) पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी वैद्यकिय उपचार घेण्यास पाचव्या दिवशी हि नकार दिल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे.

Exit mobile version