। छ. संभाजीनगर। प्रतिनिधी।
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते उपोषणाला बसणार आहेत.
4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला कळालेलं आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.