। नागोठणे । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड मुंबई यांच्यावतीने देण्यात येणारा सन 2018 – 19 व सन 2019 – 20 या दोन वर्षांचा राज्य पुरस्कार नागोठणे येथील रिलायन्स फाउंडेशन स्कुलच्या स्काऊट गाईड विभागाची विद्यार्थिनी मानसी पवार हिला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राज्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरवण्यात आला. स्काऊट गाईड पॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर पश्चिम, मुंबई येथे नुकताच पार पडलेल्या या सोहळ्यास सुनील केदार, आदिती तटकरे, ओम प्रकाश बकोरिया तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातून राज्य पुरस्कार उत्तीर्ण झालेल्या स्काऊट गाईडपैकी प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यातून दोन स्काऊट गाईड उपस्थित होते.