मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे श्रीवर्धनला

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे कोकण दौर्‍यावर येत असून, शनिवारी (दि.9) श्रीवर्धन तालुक्यास भेट देणार आहेत. कोकण दौरा नियोजन संदर्भात तालुकाध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पाच वाजता दिवेआगर येथील श्री सुवर्ण गणेश मंदिर दर्शन झाल्यानंतर अमित ठाकरे दिवेआगर येथील शिवाजी महाराज चौक भंडारी समाज सभागृह येथे विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर वडवली फाटा येथे मनसे कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या स्वागताची तयारी सुरू केली असुन महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांमधे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version